देवरी नाका वनरक्षकाची पसंती…? किती दिली घुस आणि झालीच नाक्यावर बदली…?

अपराध करियर महाराष्ट्र

देवरी नाका वनरक्षकाची पसंती…?

किती दिली घुस आणि झालीच नाक्यावर बदली…?

गोंदिया –

सध्या प्रत्येक शासकीय विभागात बदल्यांचे सत्र सुरू असून वनविभागातही मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. गोंदिया वनविभाग अंतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये देवरी नाका येथे नियुक्तीसाठी अनेक वनरक्षकांची विशेष पसंती असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदली आदेशात क्रमांकानुसार बदली न करता “प्रशासकीय कारणास्तव” विविध ठिकाणी नियुक्त्या करण्यात आल्याचा उल्लेख आहे. मात्र देवरी नाका येथे बदली मिळविण्यासाठी काही कर्मचाऱ्यांकडून मोठी रक्कम दिल्याची चर्चा वनविभाग कार्यालयात दबक्या आवाजात सुरू असल्याचे बोलले जात आहे.

ग्रामीण भागातील राखाण्यांमध्ये नियुक्तीसाठी वेगळी रक्कम तर देवरी नाका सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी बदलीसाठी अधिक “सेटिंग” झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यामुळे वनविभागातील बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या बदल्या झाल्याचा आरोप होत असून नेमकी किती रक्कम कोणी घेतली याबाबत पुढील भागात मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“दुसऱ्या एपिसोडमध्ये कोणत्या अधिकाऱ्यांनी किती रक्कम घेतली, कोणाच्या माध्यमातून व्यवहार झाले याचा कथित तपशील प्रसारित करण्यात येणार,” अशी चर्चा सध्या वनविभागात रंगली आहे.

टीप : वरील वृत्त हे विविध सूत्रांकडून मिळालेल्या चर्चांवर आधारित असून संबंधित विभागाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *