डूगर्गीपार पोलिसांची गोमांस विक्री करणाऱ्यावर कारवाई

शिक्षा

डूगर्गीपार पोलिसांची गोमांस विक्री करणाऱ्यावर कारवाई

सडक अर्जुनी : डूगर्गीपार पोलिसांना गोमांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ४० किलो कापलेले गोमांस व इतर साहित्य असा एकूण सुमारे ₹६,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दि. ०९/०८/२०२६ रोजी सकाळी डूगर्गीपार पोलिसांना मौजा घोटी (डव्वा), ता. सडक अर्जुनी येथील प्रकाश तुळशीराम सोनवाने हा आपल्या घरी गोमांस विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. घराच्या बाजूला असलेल्या खोलीत अवैधरित्या गोमांसाची विक्री करीत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी त्याच्याकडून ४० किलो कापलेले गोमांस, किंमत ₹६,०००/- तसेच इतर साहित्य ₹१००/-, असा एकूण ₹६,९००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध दुर्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जावेद शेख, पोलीस हवालदार राकेश राऊत, पोलीस नाईक मुळे, पोलीस शिपाई देशमुख, तसेच चापोसी निखिल भैरम यांनी केली.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली डूग्गीपार पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *