लोहिया विद्यालयात जलसंधारण दिन साजरा

शिक्षा

लोहिया विद्यालयात जलसंधारण दिन साजरा

सौंदड: येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमदास लोहिया माध्य. उच्च माध्य.विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 21/08/26 रोज शुक्रवारला लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने मा. पंकज लोहिया सचिव लो .शि. संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या प्राचार्या मा. उमा बाच्छल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक मा. मनोज शिंदे पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे प्राध्यापक आर .एन .अग्रवाल, जी .एस. कावळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सर्व मान्यवरांनी सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. पर्यवेक्षिका सौ. कल्पना काळे यांनी विद्यार्थ्यांना मृदा व जलसंधारणाची शपथ दिली. 

कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन व आभार यु .बी .डोये यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *