रयतवाडी–परसोडी जवळ भीषण अपघात; मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू

शिक्षा

रयतवाडी–परसोडी जवळ भीषण अपघात; मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू

उभ्या ट्रकला मोटारसायकलची जोरदार धडक; ब्राह्मणी खडकीच्या अमित लांजेवार यांचा दुर्दैवी अंत

नवेगावबांध : रयतवाडी–परसोडी जवळ कोहमारा–नवेगावबांध मार्गावर रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. उभ्या असलेल्या ट्रकला मागून मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे ब्राह्मणी खडकी परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक CG 07 BD 3029 हा रयतवाडी–परसोडी परिसरात उभा असताना कोहमाराकडून नवेगावबांधच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकल क्रमांक MH 35 AZ 6280 ने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अमित विष्णुदास लांजेवार (वय अंदाजे २५ वर्षे), रा. ब्राह्मणी खडकी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच नवेगावबांध पोलीस ठाण्याचे PSI आव्हाड, API अजित पाटील, PSI मेश्राम, पोलीस हवालदार बावनकर, आर. निर्वाण, पोलीस हवालदार बोधनकर, पोलीस हवालदार अमित मेंढे तसेच ११२ वाहनाचे चालक पोलीस हवालदार रामटेके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळी आवश्यक कार्यवाही करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनासाठी नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

दरम्यान, हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस करीत असून नवेगावबांध पोलीस ठाण्याचे API अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

अमित लांजेवार यांच्या आकस्मिक निधनाने ब्राह्मणी खडकी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *