बडनेरा येथे ३१ ऑगस्टला भव्य कावड यात्रा
बडनेरा : आई हिरकणी बहुउद्देशीय संस्था आयोजित भव्य कावड यात्रा २०२६ चे आयोजन सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे. महादेवाच्या भक्तीमय वातावरणात होणाऱ्या या यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सकाळी ६ वाजता ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत ही कावड यात्रा आयोजित करण्यात आली असून, यात्रेचा प्रारंभ बेबळा नदी, बडनेरा येथून होणार आहे. येथून कावड घेऊन भाविक बडनेरा ते नंदगाव खंडेश्वर रोड (बडनेरा) या मार्गाने पदयात्रा करणार आहेत.
यात्रेची सांगता कला महाविद्यालय मंदिर, मिल चाल, नवी वस्ती, बडनेरा येथे होणार आहे. भगवान भोलेनाथाच्या कृपाशीर्वादाने आयोजित करण्यात येणाऱ्या या पवित्र कावड यात्रेत सहभागी होऊन महादेवाची कृपा प्राप्त करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कावड यात्रेचे आयोजन करण ठाकूर व मिल चालवासी यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकर्ते व भाविकांकडून तयारी करण्यात येत आहे.
“बोल बम… हर हर महादेव!” या जयघोषाने बडनेरा परिसर भक्तिमय होणार असून, शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

