परसोडी साझाच्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे नागरिक त्रस्त,तात्काळ कारवाईची मागणी,कार्यालयावर फलक नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम,शेतकरी,विद्यार्थी व सामान्य नागरिकांना कामासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचा आरोप

शिक्षा

परसोडी साझाच्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे नागरिक त्रस्त,तात्काळ कारवाईची मागणी,कार्यालयावर फलक नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम,शेतकरी,विद्यार्थी व सामान्य नागरिकांना कामासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचा आरोप

गोंदिया – गोंदिया जिल्ह्याच्या सडक/अर्जुनी तालुक्यातील परसोडी साझाच्या ग्राम महसूल अधिकारी कार्यालयातील कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित ग्राम महसूल अधिकारी श्रीधर चचाणे हे सतत गैरहजर राहत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून त्यामुळे शेतकरी,विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.महसूल विभागाशी संबंधित विविध प्रमाणपत्रे,नोंदी तसेच इतर शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात जावे लागते.मात्र संबंधित ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याची तक्रार आहे.विशेष म्हणजे ग्राम महसूल अधिकारी कार्यालय हे रामलाल हेमने यांच्या घरी भाडेतत्त्वावर सुरू आहे.मात्र कार्यालयासमोर कोणतीही अधिकृत पाटी,फलक किंवा सूचना बोर्ड नसल्यामुळे हे कार्यालय आहे की खासगी निवासस्थान असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.कार्यालयाच्या अव्यवस्थित कारभारामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी तसेच परसोडी साझासाठी नवीन आणि कर्तव्यदक्ष ग्राम महसूल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.तर याप्रकरणी तहसीलदार इद्रायणी गोमासे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्याला शोकाश दिल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *