वसंत विद्यालयात नशामुक्ती अभियान; विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

शिक्षा

वसंत विद्यालयात नशामुक्ती अभियान; विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

डोंगरगाव/सडक अर्जुनी : येथील वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, डोंगरगाव येथे नशामुक्ती अभियानांतर्गत जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या ब्रह्मकुमारी ब्राह्मणकर दीदी यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.

यावेळी ब्राह्मणकर दीदी यांनी विविध उदाहरणे देत विद्यार्थ्यांना तंबाखू, दारू, गुटखा तसेच इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगत विद्यार्थ्यांनी दृढ मनोबल ठेवून निरोगी व संस्कारक्षम जीवन जगावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य के. के. काशिवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून एच. एम. नेवारे, विजय जवळकर यांच्यासह विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांकडून नशामुक्तीची सामूहिक शपथ घेण्यात आली. तसेच व्यसनमुक्त, निरोगी व सशक्त भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *