मोहगावजवळ तलाव परिसरात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; नागरिकांची पाहण्यासाठी गर्दी

शिक्षा

मोहगावजवळ तलाव परिसरात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; नागरिकांची पाहण्यासाठी गर्दी

मोहाडी : तालुक्यातील निलज आणि मोहगावच्या मध्यभागी असलेल्या मिसारी तलाव परिसरात आज, २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास, एका अज्ञात हेलिकॉप्टरने इमर्जन्सी लँडिंग केल्याची घटना समोर आली. हेलिकॉप्टर तलाव परिसरात उतरल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

हेलिकॉप्टरच्या अचानक लँडिंगमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. नागरिकांकडून हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी करण्यात आली. घटनेची माहिती प्रशासनाला मिळाल्याचे सांगण्यात येत असले तरी, हेलिकॉप्टरने नेमके कोणत्या कारणामुळे इमर्जन्सी लँडिंग केले, त्यामध्ये कोण प्रवास करत होते आणि लँडिंगमागील नेमके कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही.

प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली जात असल्याचे समजते. अधिकृत तपशील समोर आल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *