उड्डाणपुलावरील खाच्यक्यामुळे ट्रेलर नाल्यात कोसळला! शशीकरण मंदिराजवळ भीषण अपघात; केबिन तुटून चालक पाण्यात अडकला, मृत्युंजय दूत मुन्नासिंह ठाकूर यांची तातडीने मदत

शिक्षा

उड्डाणपुलावरील खाच्यक्यामुळे ट्रेलर नाल्यात कोसळला!

शशीकरण मंदिराजवळ भीषण अपघात; केबिन तुटून चालक पाण्यात अडकला, मृत्युंजय दूत मुन्नासिंह ठाकूर यांची तातडीने मदत

सडक अर्जुनी | प्रतिनिधी

मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील नवनिर्मित उड्डाणपुलावरील खच्च्यमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. शशीकरण मंदिराजवळील उड्डाणपुलावर ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या भीषण अपघातात एक ट्रेलर पुलाखाली असलेल्या नाल्यात कोसळला. या घटनेमुळे उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत आणि देखभालीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रायपूरच्या दिशेने येणारा ट्रेलर हा विटा घेऊन जात होता क्रमांक MH 04 FP 1713 हा चालक जावेद शेख (वय ४२ वर्षे) चालवत होता. ट्रेलर उड्डाणपुलावरून जात असताना पुलाच्या खालच्या बाजूस असलेल्या खाचक्यातून वाहन गेले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रेलर थेट उड्डाणपुलाखालील नाल्यात जाऊन कोसळला.

अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की ट्रेलरच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. वाहनाची केबिन तुटून नाल्यात पडली आणि चालक केबिनसह नाल्यातील पाण्यात अडकला. ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची होती.

मृत्युंजय दूत मुन्नासिंह ठाकूर यांची तातडीने मदत

अपघाताची माहिती मिळताच मृत्युंजय दूत मुन्नासिंह ठाकूर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर जखमी ट्रेलर चालकाला तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

करोडोंचा खर्च, तरीही सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील या उड्डाणपुलाच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, पुलावरील खाचखळगे आणि त्यातून घडलेला हा भीषण अपघात यामुळे बांधकामाचा दर्जा, रस्त्याची देखभाल आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि संबंधित कंत्राटदार या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन उड्डाणपुलाची तातडीने तपासणी करणार का? भविष्यात आणखी एखादा जीवघेणा अपघात होण्यापूर्वी आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *