तक्षशीला बुद्ध विहार, राजगुडा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा बौद्ध उपासक-उपासिका व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश

शिक्षा

“तक्षशीला बुद्ध विहार, राजगुडा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

बौद्ध उपासक-उपासिका व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश

सडक अर्जुनी

राजगुडा येथील तक्षशीला बुद्ध विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचे स्मरण करून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला बौद्ध उपासक-उपासिका तसेच गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एल. पी. टेकाम होते. यावेळी समितीचे अध्यक्ष संघपाल वैद्य, सचिव मनोज मेश्राम, सदस्य अविनाश मेश्राम, रामटेके सर आणि अनमोल बोरकर यांच्यासह कोडापे, पोलीस पाटील, भय्यालाल मडावी, कैलास विठोले आदी मान्यवर उपस्थित होते.

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा सामाजिक परिवर्तन, समता आणि मानवमुक्तीच्या विचारांचा प्रेरणादायी दिवस आहे. भगवान बुद्धांनी दिलेला शांती, करुणा, प्रज्ञा आणि बंधुभावाचा संदेश समाजात रुजविण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित करण्यात आली.

तक्षशीला बुद्ध विहार, राजगुडा येथे आयोजित या कार्यक्रमात बौद्ध उपासक-उपासिका आणि ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *