ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी सडक अर्जुनीत मंडळ यात्रा
सडक अर्जुनी : ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आज सडक अर्जुनी येथे मंडळ यात्रा काढण्यात आली. या यात्रेला ओबीसी समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यात्रेच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ओबीसी जनगणनेच्या मागणीचा जयघोष करत मंडळ यात्रा मोरगाव-अर्जुनीच्या दिशेने प्रस्थान करण्यात आली.
या मंडळ यात्रेत शिवसेना युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख, गोंदिया महेश भाऊ डुंभरे, रोशन बडोले, दिनेश हूकरे, ओबीसी संघटनेचे तालुका अध्यक्ष देवचंद तरोने, नगरसेवक अंकित भेंडारकर, किशोर शेंडे, मधुसूदन दोनोडे, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष, राहुल भोयर, सामाजिक कार्यकर्ते उमराव मांडरे, सामाजिक कार्यकर्ते जयेश मेश्राम यांच्यासह ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ओबीसी समाजाची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थितीचा योग्य आढावा घेण्यासाठी स्वतंत्र ओबीसी जनगणना आवश्यक असल्याची भूमिका यावेळी उपस्थितांनी मांडली. ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या जनजागृती अभियानाला समाजातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

